फक्त या महिलांना मिळणार लाभ

महिला व बालविकास विभागाने या समस्येची दखल घेतली असून, ई-केवायसी पूर्ण न झालेल्या किंवा त्रुटी असलेल्या अर्जांची फेरपडताळणी सुरू केली आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा थकित हप्ता एकत्रितपणे देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात एकदम ४,५०० रुपये (१,५०० × ३) जमा होणार आहेत. अर्जांची छाननी आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण होताच फेब्रुवारी महिन्यात हे पैसे जमा होण्यास सुरुवात होईल.

-ज्या महिलांना यापूर्वी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते मिळालेले नाहीत, त्यांना तीन महिन्यांचे एकत्रित ४,५०० रुपये मिळतील.

-ज्या महिलांना आधीच दोन महिन्यांचे हप्ते मिळाले आहेत, त्यांना फक्त जानेवारी महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता दिला जाईल.