karjmafi yojana महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गरीब शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मोठी घोषणा केली आहे. मात्र, फार्महाऊसधारक आणि श्रीमंत शेतकऱ्यांना यातून वगळले जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
बावनकुळेंची मोठी घोषणा; राज्यातील फक्त

‘या’ शेतकऱ्यांनाच मिळणार कर्जमाफीचा लाभ
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 4500 कधी मिळणार? शेवटी तारीख आलीच, या दिवशी बँक खातं होणार फुल!
Bawankule Big Announcement
शेतकऱ्यांच्या व्यथा मांडताना बावनकुळे म्हणाले की, “गरीब शेतकरी ४०-४० वर्षे शेतात राबतो. कर्जावर व्याज आणि त्या व्याजावर व्याज वाढत जातं, ज्यामुळे तो हतबल होऊन आत्महत्येचा विचार करतो. पण आम्ही आमच्या शेतकऱ्यांना असं मरु देणार नाही.” बावनकुळेंच्या या विधानामुळे कर्जमाफीच्या आशा पल्लवित झाल्या असल्या, तरी ‘गरीब शेतकरी’ नक्की कोणाला म्हणायचं आणि याचे निकष काय असतील, याबाबत अजूनही संभ्रम आहे.
दुसरीकडे, ‘लाडकी बहीण योजने’ वरून (Ladki Bahin Yojana) त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेसशासित राज्यांमध्ये ही योजना बंद पडली असल्याचा दावा करत, महाराष्ट्रात मात्र देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली ही योजना अविरत सुरू राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली. सोबतच महिलांना आता विनातारण ५ लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज मिळणार असल्याची मोठी घोषणाही त्यांनी यावेळी केली.