अजित पवारांच्या जागी कोण लढणार?
अजित पवारांच्या निधनामुळे बारामती विधानसभेची जागा रिक्त झाली असून या ठिकाणाहून कोण लढणार हे पक्षाने निश्चित केलं आहे. अजित पवारांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशीच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी घेतली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या. पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपदही सुनेत्रा पवारांकडे जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. असं असतानाच आता बारामतीमध्ये अजित पवारांच्या विधानसभेच्या जागेवरुनही सुनेत्रा पवारच उभ्या राहणार असल्याचं पक्षाने निश्चित केलं आहे.
पीएम किसान योजना: 22 वा हप्ता 2000 रुपये या दिवशी खात्यात जमा होणार PM Kisan 22nd Installment Date
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत बारामतीमधून सुनेत्रा पवारच पोटनिवडणूक लढवतील यावर एकमत झालं आहे. बारामती विधानसभेची प्रारूप मतदार यादी 10 मार्चला प्रसिद्ध झाल्यानंतर कोणत्याही क्षणी निवडणुकीची घोषणा होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निवडणूक बिनविरोध करण्यावर भर असणार आहे.