या दिवशी मिळणार ४५०० रुपये

या निर्णयानुसार आता पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट ४५०० रुपये जमा होणार आहेत. काही महिलांना यापूर्वीच दोन महिन्यांचे हप्ते मिळाले आहेत. ज्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते थकले होते, त्यांना आता एकत्रित ४५०० रुपये मिळणार आहेत. तर ज्यांना आधीच दोन हप्ते मिळाले आहेत, त्यांना जानेवारी महिन्याचा एकच हप्ता दिला जाणार आहे. याबाबतचे वृत्त एका मराठी वृत्तसंस्थेने दिलेले आहे.Ladki Bahin Yojana pendig hafta

लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार?

निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार भविष्यात लाडकी बहीण योजनेचा मासिक हप्ता १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. यासंबंधीत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात स्पष्ट संकेत दिले आहेत. हा निर्णय झाल्यास राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.