लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! तीन महिन्यांचा थकीत हप्ता एकत्र मिळणार, बँक खात्यात 4500 जमा होणार Ladki Bahin Yojana pendig hafta

Ladki Bahin Yojana pendig hafta लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे, लाडकी बहीण योजनेतील (Ladki Bahin Yojana) लाभार्थी महिलांचा ई-केवायसीच्या प्रक्रियेमुळे थकलेला तीन महिन्यांचा ४५०० रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना (Ladki Bahin Yojana) एकत्र मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे. राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चालू केलेल्या लाडकी बहीण योजनेने (Ladki Bahin Yojana) राज्यातील महिलांना थेट आर्थिक मदतीचा लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये दिला जात आहे. या योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपये मदत दिली जाते, या योजनेचा थेट राजकीय फायदा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला झाल्याचं चित्र दिसून आलं आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.(Ladki Bahin Yojana)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तीन महिन्यांचा थकीत हप्ता एकत्र मिळणार

या दिवशी मिळणार ४५०० रुपये

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी न झाल्यानं अनेक महिलांचे हप्ते थांबले आहेत. काही पैसे जमा न झाल्याने महिलांनी थेट संबंधितांकडे जात आपली नाराजी आणि संताप व्यक्त केला होता, नाराज झालेल्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही त्यांच्या खात्यांमध्ये पैसे आलेले नव्हते. काही ठिकाणी महिला थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करतानाही दिसून आल्या.

karjmafi yojana:बावनकुळेंची मोठी घोषणा; राज्यातील फक्त ‘या’ शेतकऱ्यांनाच मिळणार कर्जमाफीचा लाभ 

या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागाने संबंधित महिलांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले होते. नियम व अटी डावलून सादर करण्यात आलेल्या अर्जांची सध्या पडताळणी सुरू आहे. अशा स्थितीत लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक आणि आनंदाची मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तीन महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार आता पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट ४५०० रुपये जमा होणार आहेत. काही महिलांना यापूर्वीच दोन महिन्यांचे हप्ते मिळाले आहेत. ज्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते थकले होते, त्यांना आता एकत्रित ४५०० रुपये मिळणार आहेत. तर ज्यांना आधीच दोन हप्ते मिळाले आहेत, त्यांना जानेवारी महिन्याचा एकच हप्ता दिला जाणार आहे. याबाबतचे वृत्त एका मराठी वृत्तसंस्थेने दिलेले आहे.Ladki Bahin Yojana pendig hafta

लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार?

निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार भविष्यात लाडकी बहीण योजनेचा मासिक हप्ता १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. यासंबंधीत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात स्पष्ट संकेत दिले आहेत. हा निर्णय झाल्यास राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

Leave a Comment